अकोला : गावंडगाव येथे युवा शेतकर्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 08:31 PM2018-01-12T20:31:23+5:302018-01-12T20:39:23+5:30
आलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या व चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्याने कर्जबाजारीपणास कंटाळून १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलेगाव (अकोला): येथून जवळ असलेल्या चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येणार्या गावंडगाव येथील वसंता कान्हू राठोड या ३0 वर्षीय तरूण शेतकर्याने कर्जबाजारीपणास कंटाळून १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
वसंता राठोड याच्यावर बँकेचे तसेच सावकाराचे कर्ज होते. त्याचे त्याच्या पत्नीसोबत पटत नसल्याने ती अनेक दिवसांपासून वेगळी राहत होती. पत्नीअभावी घराची,मुलांची चिंता व त्यातच कर्जबाजारीपणा या विवंचनेत कंटाळून अखेर त्याने १२ जानेवारी रोजी सकाळी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आरती (५ वर्षे) आणि आतिष (७ वर्षे) अशी दोन मुले आहेत. मृतक वसंताने आत्महत्येपूर्वी त्याच्या मुलाकडून चिठ्ठी लिहून घेतली होती. चिठ्ठीमध्ये मृतकाच्या आत्महत्येनंतर त्याचा मुलांचा सांभाळ शासनाने करावा, असे लिहिले आहे. वसता राठोडने मुलाकडून लिहून घेतलेली चिठ्ठी मुलाकडे देऊन नंतर गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. चान्नी पोलिसांना या घटनेबाबत माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनसाठी पाठवून दिला. पण आता वसंता राठोडच्या मुलांचा सांभाळ करणार कोण, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.