लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री अकोल्यात आणले. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील असे या चार आरोपींची नावे आहेत. ठाणे पेालिसांनी घरफोड्या व मोठय़ा चोर्या तसेच लुटमार करणार्या एका टोळीला अटक केली होती. या टोळीतील चौघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक शनिवारी ठाण्यासाठी रवाना झाले होते. या चोरट्यांनी प्रशांत कुरियरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरियर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हा कुरियर बॉय ८ फेब्रुवारीच्या पहाटे अकोला रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांनी रेल्वे स्थानकाच्या वाहनतळातील स्वत:ची दुचाकी क्रमांक एम एच ३0 एन ४४९२ काढल्यानंतर समोरील चौकात आले. यावेळी पोलीस चौकीजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी काकडे यांच्याकडील १६ लाख १५ हजार रुपयांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला; मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटत असतानाही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी या चोरट्यांची माहिती देणार्यांना ५0 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते; मात्र त्यानंतरही अकोला पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या चोरट्यांना पकडल्यानंतर रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील या चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची क बुली दिली. रामदास पेठ पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अकोला : दोन किलो सोने लुटणार्यांची पोलीस कोठडीत रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 1:40 AM
अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री अकोल्यात आणले. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देचारही आरोपींना आणले अकोल्यातरामदासपेठ पोलिसांची कारवाई