अमरावतीच्या किसान रेलचा अकोल्यालाही होणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 11:16 AM2020-09-14T11:16:38+5:302020-09-14T11:16:50+5:30
अमरावती येथून लवकरच किसान विशेष रेल्वे गाडी सुरू होणार असून, अकोल्यातील शेतकºयांनाही या गाडीचा लाभ होणार आहे.
अकोला : वºहाडातील शेतकऱ्यांचा शेतमाल, संत्रा, केळी, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ व इतर नाशवंत उत्पादने देशभरातील बाजारपेठांमध्ये कमी खर्चात पोहोचविण्यासाठी अमरावती येथून लवकरच किसान विशेष रेल्वे गाडी सुरू होणार असून, अकोल्यातील शेतकºयांनाही या गाडीचा लाभ होणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी अमरावती येथून किसान रेल सुरू करण्याबाबत रेल्वेच्या अधिकाºयांसोबत नियोजन बैठक झाली. मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील आदी अधिकाºयांसोबत किसान रेलबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी रेल्वेच्या अमरावती येथून किसान रेल सुरू करण्याच्या प्रस्तावास हिरवी झेंडी दिली. ही रेल्वे अमरावती येथून कोणत्या मार्गाने जाणार हे निश्चित नसले, तरी अकोला येथील शेतकºयांचा माल अमरावतीपर्यंत पाठविण्यासाठी अकोला रेल्वेस्थानकावरून स्वतंत्र डब्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे या बैठकीला उपस्थित असलेले पश्चिम विदर्भ विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पश्चिम विदर्भ विकास परिषदेच संयोजक नितीन भुतडा व निमंत्रक गजानन कोल्हे यांच्यासह सर्व सदस्यांनी किसान रेल्वेची मागणी गडकरी यांच्याकडे लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश आले आहे.
किसान रेल्वेसाठी स्वतंत्र वेळापत्रक
शेतकºयांचा माल देशातील विविध बाजारपेठांमध्ये पोहोचविण्यासाठी रेल्वे स्वतंत्र वेळापत्रक तयार करणार आहे. एवढेच नव्हे, तर या वेळापत्रकाची माहिती देणारी व हंमागानुसार उपलब्ध होणारा शेतमाल पाठविण्यासाठी बुकिंग करता यावी, याकरिता रेल्वे लवकरच एक किसान रेल्वे समर्पित संकेतस्थळ विकसित करणार आहे. या सर्व बाबींचे नियोजन ताबडतोब करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाºयांनी नितीन गडकरींना दिल्याचे दिनेश सूर्यवंशी यांनी सांगितले.