महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अकोल्याचे मल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 02:33 PM2018-12-23T14:33:42+5:302018-12-23T14:34:34+5:30
अकोला: जालना येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अकोला जिल्हा कुस्ती संघाचा सहभाग असून, अकोल्याचे मल्ल स्पर्धेत चांगली कामगिरी करीत असल्याची माहिती अकोला जिल्हा कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र गोतमारे यांनी दिली आहे.

जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्यावतीने अकोट येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कुस्तीपटूंची निवड चाचणी घेण्यात आली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी विभागात अमोल फितवे ५७ किलो, तुषार गोतमारे ६१ किलो, कृष्णा मलिये ६५ किलो, गणेश नागे ८६ किलो, मंगेश अंभोरे ९२ किलो, अमित चादे ९७ किलोग्रॅम, माती विभागात निशांत मात्रेकर ५७ किलो, अक्षय तायडे ६१ किलो, प्रेम सोनू ६५ किलो, मोहन अंबळकर ७० किलो, कार्तिक नागे ७४ किलो, ऋषिकेश सटाले ८६ किलो, वैभव गाडे ९२ किलो, नारायण नागे ९७ किलो, श्याम नागे १२५ किलोग्रॅम वजनगटात अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत आहेत. कुस्तीगिरांना मार्गदर्शक रमेश मोहोकार, मुरलीधर वानखडे, नाना गोसावी, राजेश नेरकर, संजय अकोटकर, शिवा सिरसाट, कुणाल माधवे, गणेश माळी, किशोर अरुळकर, सुरेश श्रीनाथे, राजेश इंगळे, अशोक घोडके व रवी मुळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.