Akola ZP : २.३४ कोटींच्या योजनांना मंजुरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:32 AM2020-08-01T10:32:18+5:302020-08-01T10:32:34+5:30

२ कोटी ३४ लाख ७७ हजार रुपयांच्या विविध योजना राबविण्यास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.

Akola ZP: 2.34 crore schemes approved! | Akola ZP : २.३४ कोटींच्या योजनांना मंजुरी!

Akola ZP : २.३४ कोटींच्या योजनांना मंजुरी!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महिलांना प्रशिक्षण व सक्षमीकरणासह साहित्य वाटपाच्या २ कोटी ३४ लाख ७७ हजार रुपयांच्या विविध योजना राबविण्यास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांसाठी प्रशिक्षण व सक्षमीकरणाच्या योजना आणि साहित्य वाटपाच्या योजना राबविण्याचे सभेत ठरविण्यात आले. त्यामध्ये २ कोटी ३४ लाख ७७ हजार रुपयांच्या योजनांचा समावेश आहे. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती मनिषा बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समितीच्या सदस्य गायत्री कांबे, योगिता रोकडे , रिजवाना परवीन, मीनाक्षी उन्हाळे , लता नितोने, वंदना झळके , उर्मिला डाबेराव, अनुसया राऊत यांच्यासह उप-मुख्य कार्यकारी अधिकारी विलास मरसाळे उपस्थित होते.

Web Title: Akola ZP: 2.34 crore schemes approved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.