अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रूवारी-मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. जाहिर झालेल्या आॅनलाईन निकालानुसार अकोला जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८९.६८ टक्के, तर मुलांचा निकाल ८२.०१ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकुण २८ हजार १८८ नोंदणीकृत परिक्षार्थी विद्यार्थी होते. त्यापैकी २८ हजार ०८६ विद्यार्थी प्रत्यक्ष परिक्षेस बसले होत. त्यापैकी ५ हजार ७८० विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, ८ हजार ३०४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७ हजार ९६३ द्वीतीय श्रेणीत, तर २ हजार ९७९ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकुण २४ हजार ५२ विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्याचा सर्वाधिक ९०.१० टक्के निकाल लागला आहे. उर्वरित तालुक्यांत बार्शीटाकळी -८९.४० टक्के, मुर्तीजापूर-८८.०५ टक्के, बाळापूर-८६.५७ टक्के,अकोला -८५.०२, तेल्हारा - ८२.५४ टक्के, तर अकोट तालुका ८२. २५ टक्के निकाल आहे.
अकोल्याच्या मुलीच हुश्शाार; जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के
By atul.jaiswal | Published: June 08, 2018 3:10 PM
अकोला : आॅनलाईन निकालानुसार अकोला जिल्ह्याचा निकाल ८५.६४ टक्के लागला असून, बारावी परिक्षेच्या निकालाप्रमाणे दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली आहे.
ठळक मुद्दे मुलींचा निकाल ८९.६८ टक्के, तर मुलांचा निकाल ८२.०१ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकुण २८ हजार १८८ नोंदणीकृत परिक्षार्थी विद्यार्थी होते. एकुण २४ हजार ५२ विद्यार्थी परिक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.