राज्यस्तरीय गीतगायन स्पर्धेत अकोल्याचा गोपाल महाराष्ट्रातून प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:09 PM2019-08-31T15:09:46+5:302019-08-31T15:09:53+5:30
गोपाल रविंद्र गावंडे या विद्यार्थ्याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.
अकोला : एका खासगी रेडीओ वाहिनीतर्फे सोलापूर येथे आयोजित गीतगायन स्पर्धेत अकोला येथील श्री शिवाजी महाविद्यालयात संगीत विषयात एम. ए. चा विद्यार्थी असलेल्या गोपाल रविंद्र गावंडे या विद्यार्थ्याने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. या स्पर्धेत गोपालला सर्वाधिक आॅनलाईन मते मिळला होती.
सोलापूर येथे शुक्रवार, ३१ आॅगस्ट रोजी ‘सुपर सिंगर सिंगिंग कॉम्पिटीशन’ची अंतीम फेरी पार पडली, यामध्ये आपल्या स्वरांची जादू दाखवीत प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह आणि रोख ५१००० रुपयांचे बक्षीस मिळवून महाराष्ट्रातून पहिला येण्याचा व ‘रेडिओ सिटी ९१.१’ चा सुपर सिंगर होण्याचा बहुमान मिळवला आहे. अकोल्यात बुधवार, २८ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या चाचणी फेरीत गोपाल गावंडे हा अकोला विभागतून प्रथम आला व त्याची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. दहीगाव-गावंडे येथील रहिवासी असलेला गोपाल हा अकोल्यातील एका संगीत अकादमीत संगीताचे धडे गिरवित आहे. आई-वडील तसेच प्रा. किशोर देशमुख, प्रा. शिरीष कडू आणि धनंजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात आपण हे यश मिळवू शकलो, अशी प्रतिक्रिया गोपाल गावंडेने व्यक्त केली आहे.