अकोला जिल्ह्यात आणखी १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 12:27 PM2020-11-09T12:27:30+5:302020-11-09T12:27:38+5:30
Akola Corona News १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा सैल होत असून, सोमवार ९ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्य १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५५९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये कौलखेड व जेतवन नगर येथील प्रत्येकी दोन, पारस, आनंद नगर डाबकी रोड, विठ्ठल नगर मोठी उमरी, कृषी नगर, न्यू राधाकिशन प्लॉट, राधाकिशन प्लॉट, केतकी अपार्टमेंट व व्याळा ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक अशा १२ जणांचा समावेश आहे.
२२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,५५९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २२६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.