आणखी १२७ पॉझिटिव्ह, २६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:18 AM2021-02-14T04:18:23+5:302021-02-14T04:18:23+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५०२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५०२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३९६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २४, मूर्तिजापूर येथील १३, मोठी उमरी येथील सहा, कौलखेड येथील चार, गोरक्षण रोड, आळशी प्लॉट, जीएमसी, सिंधी कॅम्प व केशवनगर येथील प्रत्येकी तीन, न्यू खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, तेलीपुरा, रामनगर, तापडिया नगर, साईनाथ कॉलनी व चिरानिया हॉस्पिटल येथील प्रत्येकी दोन, तर वानखडे नगर, रणपिसे नगर, जीएमसी होस्टेल, जीएसी क्वॉर्टर, राऊतवाडी, पातूर, रेल्वे कॉलनी, सिंधी कॉलनी, न्यू राधाकिसन प्लॉट, अकोट फैल, मनपा हिंदी शाळा, मुझफ्फरनगर, विद्यानगर, रतनलाल प्लॉट, सिव्हिल लाईन, सावरा ता. अकोट, बाळापूर, गायगाव, गीतानगर, रणपिसे नगर, माला कॉलनी, डाबकी रोड, संतोष नगर, देशमुख फैल, जवाहर नगर, लहान उमरी, गंगानगर, कीर्तिनगर, शिवनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी धाबा ता. बार्शीटाकळी येथील दोन, तर हाता ता. बाळापूर, साईनाथ कॉलनी, वाडी ता.तेल्हारा, मूर्तिजापूर व बस स्टँण्ड मागे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
२६ जणांना डिस्चार्ज
आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून दोन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून चार, अवघाते हॉस्पिटल येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून तीन तर होम आयसोलेशन येथून १२ अशा एकूण २६ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
८६३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,२९७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,०९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८६३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.