अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मंदावला असला, तरी रुग्ण आढळण्याचे सत्र सुरुच आहे. शुक्रवार ६ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,५१४ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ११७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १०४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी दोन, शिवाजी पार्क, आलेगाव ता. पातूर, तापडिया नगर, दीपक चौक, बलोदे लेआऊट, मुर्तिजापूर, गोरक्षण रोड, माधव नगर व राऊत वाडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण १३ रुग्णांचा समावेश आहे.२१७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,५१४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८०१५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१७ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.