अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, मंगळवार, ८ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी १९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९६९९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १८९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ येथील तीन जण, गोरक्षण रोड, डाबकी रोड, उन्नती नगर, कौलखेड व रामदासपेठ येथील प्रत्येकी दोन, तर बिर्ला कॉलनी, आदर्श कॉलनी, तापडीया नगर, मलकापूर, दिपक चौक व बैदपूरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६७० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९६९९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७२९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६७० अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.