अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह, ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ७३७ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 01:43 PM2020-12-25T13:43:44+5:302020-12-25T13:44:01+5:30
CoronaVirus News शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १०३१३ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, शुक्रवार, २५ डिसेंबर रोजी आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १०३१३ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी एकूण ५५८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५३२ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर येथील तीन, बार्शीटाकली, बाळापूर व माधव नगर येथील प्रत्येकी दोन, तर मोरझरी ता. बाळापूर, तापडीया नगर, बातूर अकोट, मलकापूर, सुधीर कॉलनी, देशमुख फैल, मोठी उमरी, रामदास पेठ, टॉवर चौक, बिर्ला रोड, शास्त्री नगर, रणपिसे नगर, अकोट फैल, तोष्णीवाल लेआऊट, गायगाव, गांधी चौक व किनखेड पूर्णा ता. अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
७३७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३१३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,२६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ७३७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.