अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:24 PM2021-01-14T12:24:55+5:302021-01-14T12:25:39+5:30

Coronavirus News २६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ११,०४० वर पोहोचली आहे.

Another 26 corona positive patients were found in Akola district | अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

अकोला जिल्ह्यात आणखी २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next
ठळक मुद्देआरटीपीसीआर चाचण्यांचे ४४८ अहवाल प्राप्त झाले.४२२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सद्य:स्थितीत ६२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे सत्र सुरुच असून, गुरुवार, १४ जानेवारी रोजी आणखी २६ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या ११,०४० वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४४८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४२२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये डाबकी रोड येथील चार, सहकार नगर, चिंतामणी नगर व जुने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर येथील दोन, तर कौलखेड, अकोट, शिवर, सराफा बाजार, जुने खेतान नगर, तोष्णीवाल लेआऊट, दुर्गा चौक, सिंधी कॅम्प, मोठी उमरी, जठारपेठ व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

 

६२९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,०४० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल १०,०८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Another 26 corona positive patients were found in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.