अकोला जिल्ह्यात आणखी ४० कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 12:32 PM2020-12-27T12:32:44+5:302020-12-27T12:32:55+5:30
CoronaVirus in Akola एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०,३७६ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार, २७ डिसेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०,३७६ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी ५०० चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४६० अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये माने एक्स रे, आर.एल. टी. कॉलेजजवळ येथील सहा जण, कामा प्लॉट टॉवर चौक येथील पाच जण, नवनीत अपार्टमेंट येथील तीन जण, खडकी येथील दोन, आदर्श कॉलनी येथील दोन, केशवनगर येथील दोन, तोष्णीवाल लेआऊट येथील दोन जण, रजपुतपुरा येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, मलकापुर येथील दोन, बार्शीटाकळी, गुलजारपुरा, येळवण ता. अकोला, विठ्ठल नगर, न्यु देशमुख फाईल, चोहोट्टाबाजार, स्वावलंबी नगर, शास्त्री नगर, तुकाराम चौक, मोरेश्वर कॉलनी, गीतानगर, जुना राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
५६६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,३७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,४९४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३१६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५६६ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.