अकोला जिल्ह्यात आणखी ४० कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:02 PM2021-01-10T16:02:57+5:302021-01-10T16:03:21+5:30
CoronaVirus in Akola आणखी ४० जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०९११ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, रविवार, १० जानेवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४० जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०९११ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ४३८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सिंधी कॅम्प येथील तीन, डाबकी रोड, मलकापूर, जठारपेठ व रणपिसे नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जांभा ता. मुर्तिजापूर, रचना कॉलनी, मरोडा ता. अकोट, पीकेव्ही, राधे नगर, न्यु तापडीया नगर, कृषि नगर, भीम नगर, जूने शहर, अकोट, छोटी उमरी, खडकी, आर.के. प्लॉट, गीता नगर, गोरक्षण रोड, तांदळी बु. ता. पातूर, सहारा नगर, कैलास नगर, बिर्ला गेट, गौतम नगर, अशोक नगर, आदर्श कॉलनी, व्हिएचबी कॉलनी, दक्षता नगर, कौलखेड, पातूर, दिपक चौक, सिलोडा व रामदासपेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
६३४ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १०,९११ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ९,९५४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३२३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.