अकोला जिल्ह्यात आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:29 PM2021-02-10T12:29:58+5:302021-02-10T12:30:14+5:30
CoronaVirus News आणखी ४८ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या ११,९८२ वर पोहोचली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, १० फेब्रुवारी रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी ४८ पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या ११,९८२ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३४२ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड,गीता नगर, मुर्तिजापूर व जूने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, देशमुख फैल, खडकी व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर राऊतवाडी, रचना कॉलनी, गजानन नगर, मोठी उमरी, शिवनगर, खोलेश्वर, अकोट, मोरद ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, तापडीया नगर, दिपक चौक, केडीया प्लॉट, अंनत नगर, केशवराज वेटाळ ता.पातूर, सिंधी कॅम्प, न्यु तापडीया नगर, सिव्हील लाईन, भागवत वाडी, लहरीया नगर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
८३२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११,९८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १०,८०९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ८३२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.