अकोला : कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे सत्र सुरूच असून, बुधवार, २४ मार्च रोजी जिल्ह्यात आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४३१ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६२, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये ६६ असे एकूण ३२८ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण बाधितांचा आकडा २५,४३६ वर पोहोचला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १०६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७९८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील ३८, डाबकी रोड येथील २१, हसनपूर व हिवरखेड येथील प्रत्येकी १०, पाथर्डी, जुने शहर, गुरुदेव नगर, अकोट, शिवसेना वसाहत येथील प्रत्येकी ५, आडगांव, हरिहरपेठ, सोनटक्के प्लॉट, गीता नगर, गजानन नगर, गणेश नगर येथील प्रत्येकी ४, आडगांव बु., हमजा प्लॉट, मोठी उमरी, घुसर, व्याळा, हता, हिवरा कोरडे, रसुलपूर, अकोट फाईल येथील प्रत्येकी ३, धारुडे, गुलजारपुरा, बार्शीटाकळी, आगरवेस, भारती प्लॉट, राजेश्वर नगर, कलेक्टर कॉलनी, अनीकट, तापडीया नगर, गड्डम प्लॉट, पळसो, बोरगांव मंजू, करंजा राम येथील प्रत्येकी २, रुईखेड, भिमनगर, शिवाजी नगर, गाडगे नगर, भांडपूरा, मारोती नगर, भिरडवाडी, पोळा चौक, जाजू रेल्वे गेट, वाशीम बायपास, गंगा नगर, जयहिंद चौक, महाकाली नगर, बालाजी नगर, गायत्री नगर, लोकमान्य नगर, बहूरत, खैर मोह. प्लॉट, शरीफ नगर, संकल्प नगर, कुंभारी, खडकीपुरा, रुपचंद नगर, वानखडे नगर, मेहरे नगर, रणपीसे नगर, गुडवाले प्लॉट, नागड, सुकोडा, शिव नगर, राम नगर, तुकाराम हॉस्पिटलच्या मागे, तुकाराम चौक, खडकी, बापू नगर, निंब वाडी, सिंधी कॅम्प, पी.के.व्ही. कॉलनी, निवारा कॉलनी, आदर्श कॉलनी, युमुना नगर, शिवनी, माळी पुरा, शिवर, डोंगरगांव, लाखोंडा बु., जी.एम.सी. होस्टेल, दहीहांडा, पाटी, हातगांव, नवा अंदुरा, खेर्डा, कुरमखेड, बटवाडी, अकोली खुर्द, खदान, भेंडीमहाल, खोलेश्वर, नर्सिंग कॉलनी, बाळापूर रोड, वाशीम बायपास, बाभूळगांव, निपाणा, चित्रनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार सुरु असलेल्या मोठी उमरी येथील ७२ वर्षीय महिलेचा बुधवारी मृत्यू झाला. या महिलेस १४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
६,२९२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २५,४३६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १८,७१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६,२९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.