अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, मंगळवार, २ मार्च रोजी आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने, एकूण बळींची संख्या ३७१ एवढी झाली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४७, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये ६५ अशा एकूण २१२ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या १६,८२०वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ९३० अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७८३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तेल्हारा येथील ३५, पातूर येथील १७, एमआयडीसी येथील १४, बाळापूर येथील १२, गोरक्षण रोड, झुरल बु., डोंगरगाव व उगवा येथील प्रत्येकी पाच, पारस व उरल खु. येथील प्रत्येकी चार, गुडधी, हिवरखेड व गाडेगाव येथील प्रत्येकी तीन, टेलीफोन कॉलनी, गजानन पेठ, आगीखेड ता.पातूर, भरतपूर, खेडकर नगर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, सुधीर कॉलनी, वडद, अकोट, आकाशवाणी, विद्युत कॉलनी, अयोध्या नगर, अंतरी, मोरझाडी, वाडेगाव,जवाहर नगर, शास्त्री नगर, अनिकेत, शिवणी, मोठी उमरी, आरएमओ हॉस्टेल, घुसर, बोरगाव मंजू, दोनद बु., डाबकी रोड व जठारपेठ येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
शिवणी येथील महिलेचा मृत्यू
कोरोनावर उपचार घेत असलेल्या शिवनी येथील ५८ वर्षीय महिला रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यांना २५ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
३,८७५ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १६८२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १२,५७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ३७१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ३,८७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.