कोरोनाचा आणखी एक बळी; २५ नवे पॉझिटिव्ह, २० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 06:07 PM2020-12-08T18:07:40+5:302020-12-08T18:07:58+5:30
Akola coronaVirus News अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०१ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, मंगळवार, ८ डिसेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३०१ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये आणखी २५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ९७०५ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३१७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जठारपेठ येथील तीन जण, गोरक्षण रोड, डाबकी रोड, उन्नती नगर, कौलखेड व रामदासपेठ येथील प्रत्येकी दोन, तर बिर्ला कॉलनी, आदर्श कॉलनी, तापडीया नगर, मलकापूर, दिपक चौक व बैदपूरा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. संध्याकाळी बार्शीटाकळी बस स्टॅण्ड, तारफैल, बाळापूर, खदान, घुसर व कौलखेड येथील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
मंगळवारी खाजगी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण सातव चौक भागातील ६१ वर्षीय पुरुष असून, त्यांना २५ नोव्हेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
२० जणांना डिस्चाज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून आठ, आयकॉन हॉस्पीटल येथून सहा, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, बिºहाडे हॉस्पीटल येथून दोन अशा एकूण २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
६५५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९७०५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ८७४९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ६५५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.