अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५० नवे पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:08 PM2020-09-12T13:08:53+5:302020-09-12T13:09:34+5:30
५० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३३९ झाली आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकुळ सुरुच असून, शनिवार, १२ सप्टेंबर रोजी आणखी एक रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७६ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ५० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५३३९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २२३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५० अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १४ महिला व ३६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये खोलेश्वर येथील चार, तापडीया नगर व कौलखेड येथील प्रत्येकी तीन, निमवाडी, रामनगर, रणपिसे नगर, बाळापूर नाका, महान व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, खेतान नगर, जितापूर ता. अकोट, गीतानगर, जेतवन नगर, मलकापूर, खेडकर नगर, बलोदे लेआऊट, लहान उमरी, अकोट, करोडी ता. अकोट, गोरक्षण रोड, राऊतवाडी, डोंगरगाव, संतोषनगर, खैर मोहम्मद प्लॉट, खडकी, रेणुकानगर, शास्त्री नगर, गजानन पेठ, डाबकी रोड, पारस, कांचनपूर, वाशिंबा, बार्शिटाकळी, वाडेगाव, उमरी व शिर्ला अंधारे येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
शास्त्री नगर येथील पुरुषाचा मृत्यू
कोरोनामुळे शनिवारी आणखी एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्हा परिषद कॉलनी, शास्त्री नगर, अकोला येथील ६० वर्षीय पुरुष असून त्यांना ११ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
११४६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५३३९ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४०१७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११४६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.