अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, रविवार, १४ फेब्रुवारी रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्यामुळे कोरोनाबळींचा आकडा ३४३ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९८ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, एकूण बाधितांची संख्या १२,३९५ वर पोहोचली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये तापडीया नगर, डाबकी रोड व शिवणी येथील प्रत्येकी चार, चर्तुरभुज कॉलनी, कारंजा राम ता.बाळापूर, विद्या नगर, जठारपेठ, मोठी उमरी व तेल्हारा येथील प्रत्येकी तीन, वानखडे नगर, गोरक्षण रोड, पातूर, खानापूर ता.पातूर, गोकूल कॉलनी, कैलाश टेकडी, मलकापूर, जवाहर नगर, शास्त्री नगर, गीता नगर, ज्योती नगर, जीएमसी, गोडबोले प्लॉट येथील प्रत्येकी दोन, खेडकर नगर, खडकी, मनारखेड,हिंगणा फाटा, कलेक्टर ऑॅफीस, बोरगाव मंजू, ज्योती नगर, रणपिसे नगर, न्यु राधेश्याम प्लॉट, चोहट्टा बाजार, नंदीपेठ, संत नगर, गुलशन कॉलनी, पास्टूल, निंभोरा, आाळसी प्लॉट, शिवणी, दहीहांडा, न्यु तापडीया नगर, राम नगर, श्रीकृष्ण नगर, अंबिकापूर, वृंदावन नगर, म्हाडा कॉलनी, गणेश नगर, कौलखेड, लहान उमरी, तुकाराम चौक, लकडगंज, रामदासपेठ, अनिकेत चौक, रेल्वे कॉलनी, पिंजर, वाशिम रोड व त्र्यंबक नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी कौलखेड, राउतवाडी, विद्या नगर, बाळापूर, अमानखा प्लॉट, बार्शीटाकळी व अकोट येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
८५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू
खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तापडीया नगर, अकोला येथील ८५ वर्षीय पुरुषाचा रविवारी मृत्यू झाला. त्यांना ८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.
४८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून १२, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, स्कायलार्क हॉटेल येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून एक, तर होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले २८ अशा एकूण ४८ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
९१२ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १२,३९५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ११,१४० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ३४३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.