थर्टी फर्स्टला सुरक्षात्मक खबरदारी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:10 AM2020-12-28T04:10:51+5:302020-12-28T04:10:51+5:30
लग्नसमारंभात होतेय बेफिकिरी अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्नसमारंभात गर्दी टाळण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. परंतु, ...
लग्नसमारंभात होतेय बेफिकिरी
अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लग्नसमारंभात गर्दी टाळण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. परंतु, जिल्ह्यात लग्नसमारंभात अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. मंगल कार्यालयांमध्ये परवानगीपेक्षा जास्त लोकांची गर्दी दिसून येत आहे. हा प्रकार कोरोनाच्या फैलावास कारणीभूत ठरत आहे.
स्टेशन मार्गाची दुरवस्था
अकोला : जेल चौक ते अकोला क्रिकेट क्लब मागार्वर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. मात्र, येथून पुढे अग्रसेन चौक ते रेल्वे स्टेशनपर्यंतचा मार्ग मोकळा आहे. वर्षभरापूर्वीच या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. काही दिवसांतच या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
जुने शहरात रात्रीचा पोलीस बंदोबस्त
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने शहरातील विविध भागात रात्रीचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जुने शहरात जयहिंद चौक, डाबकी रोड, भांडपुरा पोलीस चौकीजवळ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी केली जात आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात अस्वच्छता
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात किरकोळ व्यावसायिकांनी दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांकडून उगड्यावरच कचरा टाकला जातो, तसेच रुग्णालयातीलही कचरा उघड्यावरच टाकला जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली आहे. रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.