बाजार समितीत करडईची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:18 AM2021-04-10T04:18:41+5:302021-04-10T04:18:41+5:30
अकोला : बाजार समितीत करडईची आवक सुरू आहे. शुक्रवारी करडईला सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर १२ क्विंटल ...
अकोला : बाजार समितीत करडईची आवक सुरू आहे. शुक्रवारी करडईला सरासरी ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला, तर १२ क्विंटल आवक झाली. बाजार समितीत एखाद्या वेळेलाच करडई विक्रीला येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
--------------------------------------------------
कृषी कार्यालयातील सॅनिटायझर मशीन बंद
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात आवश्यक काम असल्यास परवानगी मिळत आहे; मात्र मागील काही दिवसांपासून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील सॅनिटायझर मशीन बंद आहे. त्यामुळे हात निर्जंतुकीकरण न करता कार्यालयात प्रवेश करावा लागत आहे.
-----------------------------------------------------
जिल्ह्यात पावसाचे संकेत
अकोला : ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील तापमानात दोन दिवसांपासून घट होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच काही भागात पावसाचे संकेत आहे; मात्र पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
------------------------------------------------------
‘तो’ रस्ता प्रगतिपथावर
अकोला : महाबीज कार्यालय ते शिवनीदरम्यान रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. या रस्त्याचे काम प्रगतिपथावर असून, लवकरच काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रस्ता पूर्ण झाल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.
------------------------------------------------------