आशा सेविका व गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:26 AM2021-06-16T04:26:22+5:302021-06-16T04:26:22+5:30
कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दररोज सात ते आठ तास काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना ...
कृती समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दररोज सात ते आठ तास काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेमध्ये कायम करावे. आशा सेविकांना सर्व सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात. या मागण्या पूर्ण होईपर्यंत आशा सेविकांना दरमहा १८,००० व गटप्रवर्तकांना २२,००० वेतन द्यावे. तसेच ठरवून दिलेले भत्तेही द्यावेत. आशा सेविका व गटप्रवर्तकांना दरमहा कायम व निश्चित स्वरूपाची केलेली वाढ त्वरित देण्यात यावी. आशा, गटप्रवर्तक व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा मोफत द्यावी. आरोग्य विभागात ५० टक्के आरक्षण द्यावे. आशा सेविकांना आरोग्यविषयक सर्व साहित्य देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन शासन दरबारी दिले असून, या मागण्या मंजूर न झाल्यास आज, मंगळवारपासून सर्व आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर जातील, याची नोंद घ्यावी. याबाबतीत आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी एन. के. चव्हाण यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
फोटो: