पाच हजाराची लाच मागणारा महावितरणचा सहायक अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 05:43 PM2019-09-17T17:43:09+5:302019-09-17T17:56:24+5:30

विनोद लांजेवार असे या अभियंत्याचे नाव असून, पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Assistant Engineer of Mahavitaran in the trap of 'ACB' demanding five thousand bribe | पाच हजाराची लाच मागणारा महावितरणचा सहायक अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

पाच हजाराची लाच मागणारा महावितरणचा सहायक अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

googlenewsNext

अकोला : विज जोडणीसाठी एका महिलेकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पातूर येथील महावितरणच्या सहायक अभियंत्यास लाचलूचपत प्रतीबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रंगेहाथ पकडले. विनोद लांजेवार असे या अभियंत्याचे नाव असून, एसबीच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पातूर शहरातील एका महिलेने नवीन विद्युत जोडणीसाठी अर्ज केला होता, परंतु तिला दाद मिळत नव्हती. कार्यालयाच्या चकरा मारूनही तिला जोडणी मिळाली नाही. त्यासाठी तिने सहायक अभियंता विनोद लांजेकर याची भेट घेतली. त्यावेळी विनोद लांजेकर याने तिच्याकडे कोटेशन भरण्याच्या नावाखाली ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. महिलेला लाच देणे मंजूर नसल्याने तिने विनोद लांजेकरची लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत विभागाच्या पथकाने १७ सप्टेंबर रोजी महिलेच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिलेच्या तक्रारीची शहानिशा केली. पंच समक्ष महिलेला पाच हजाराची मागणी विनोद लांजेकर यांनी केल्याचे स्पष्ट झाले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मेमाने यांनी पातुर पोलिसात रीतसर तक्रार देऊन लाच मागणा?्या सहाय्यक अभियंता विनोद लांजेकर विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Assistant Engineer of Mahavitaran in the trap of 'ACB' demanding five thousand bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.