मुंडगाव येथे एटीएम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:55+5:302021-06-21T04:14:55+5:30
सायखेड येथे गावठी दारू अड्ड्यांना ऊत! बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावठी दारू अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. या अवैध ...
सायखेड येथे गावठी दारू अड्ड्यांना ऊत!
बार्शीटाकळी : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावठी दारू अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. या अवैध धंदेचालकांना नेमके पाठबळ कुणाचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सायखेड येथे तर गावठी दारू अड्ड्यांना ऊत आला आहे. याबाबत तक्रार करूनसुद्धा पोलीस कारवाई करण्याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र आहे.
नियमांचे उल्लंघन, मूर्तिजापुरात वाहनचालकांवर कारवाई
मूर्तिजापूर : शहर वाहतूक पोलिसांनी मूर्तिजापुरात कायदा मोडणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू केला असून अनेक वाहनधारकांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात शिवाजी चौक, उड्डाणपूल बायपास, अकोलानाका, दर्यापूर रोड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांनी कायदा मोडणारे दुचाकी वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. कोरोना महामारीमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी शासनाने अनेक नियम लागू केले आहेत. परंतु, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
शेतकऱ्यांना पीकविमा केव्हा मिळणार?
आगर : मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाला असून, या पिकांसाठी शेतकऱ्यांनी काढलेला पीकविमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. पीकविमा मिळण्यासाठी शेतकरी विलास अहीर, डिगांबर वक्टे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले आहे.
पातूर, नंदापूर येथे अनियमित वीजपुरवठा
पातूर नंदापूर : येथे वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असून ग्राहक त्रस्त झाले आहेत. पिंजर सबस्टेशनांतर्गत येणाऱ्या पातूर, नंदापूर येथे उन्हाळ्याच्या दिवसांत सातत्याने वीजपुरवठा खंडित होत नागरिक त्रस्त झाले आहेत. तक्रार करूनसुद्धा दखल घेण्यात येत नाही. उन्हाचा कडाका वाढत असताना, येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
प्रवासी वाहनांकडून नियमांची पायमल्ली
चोहोट्टा बाजार : कोरोनामुळे प्रशासनाने निर्बंध आणले आहेत. प्रवासी वाहतूक करताना आसनक्षमतेच्या ५० टक्के सूट दिली असतानाही, अकोला-अकोट खासगी बसगाड्या व काळीपिवळी वाहनांमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्ककडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र आहे.