राजगृहावरील हल्ल्याचा अकोल्यात निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 06:59 PM2020-07-08T18:59:55+5:302020-07-08T19:00:34+5:30
मुंबईस्थित ‘ राजगृह’ वर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदविण्यात आला.
अकोला - विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेले मुंबईस्थित ‘ राजगृह’ वर झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने बुधवारी निषेध नोंदविण्यात आला. येथील जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी झालेल्या निषेध सभेत आरोपीला अटक होईपर्यंत शांतता प्रस्थापित करून त्यानंतर पुढील आंदोलन जाहीर करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे, राज्य प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन फुंडकर,वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाठ, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने आदी उपस्थित होते.
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने दिले निवेदन
राजगृहावर अज्ञातांकडून झालेल्या तोडफोडचा निषेध करून जिल्हा कॉंंग्रेस कमिटी अनुसूचीत जाती विभागाच्यावतीने जिल्हा कार्याध्यक्ष भूषण गायकवाड व महानगराध्यक्ष आकाश सिरसाट यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करून कडक शासन करण्यात यावे, अन्यथा देशभरात असंतोष पसरेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला.