सोयाबीनवर चक्रभुंगा, तंबाखुची पाने खाणाऱ्या अळीचे आक्रमण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 12:38 PM2019-08-07T12:38:24+5:302019-08-07T12:38:31+5:30
विदर्भातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व तंबाखुची पाने खाणाºया अळीने आक्रमण केले आहे.
अकोला : मागील १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व तुरळक स्वरू पाचा पाऊस सुरू असून, हे वातावरण पिकावरील कीड,अळींना पोषक ठरत असल्याने विदर्भातील सोयाबीन पिकावर चक्रभुंगा व तंबाखुची पाने खाणाºया अळीने आक्रमण केले आहे. या वातावरणात किडीचे व्यवस्थापन करता येत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे.
विदर्भात यावर्षी मान्सून उशिरा पोहोचला, असे असले तरी १६ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. पेरणीनंतर चार आठवडे पावसाने दडी मारली. २६ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. तथापि, पावसात दम नाही; परंतु सतत ढगाळ वातावरण असून, काही भागात तुरळक तर काही ठिकाणी फवारणीसारखा पाऊस होत आहे. यामुळे पिकांचे व्यवस्थापन करण्यात अडचण येत आहे. तणनाशक किंवा कीटकनाशक फवारणी केल्यावर किमान सहा तास पाऊस नको. तथापि, त्यावर लगेच फवारणीसारखा पाऊस पडत असून, फवारलेले रसायन, कीटकनाशक कुचकामी ठरत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. परिणामी, सोयाबीनवर चक्रभुंगा, खोडमाशी तर काही ठिकाणी हिरवी व तंबाखुचे पाने खाणाºया अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अळ््या व कीड आणखी वाढण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
- सोयाबीनवर चक्रभुंगा व खोडमाशी आली आहे. याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जात असून, शिफारशीप्रमाणे कीटकनाशके फवारणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
डॉ.अनिल कोल्हे,
मुख्य बीज संरक्षण अधिकारी,
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.