पोलीस उपनिरीक्षकास चिरडण्याचा प्रयत्न, दोन प्रवासी वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:40 AM2017-12-28T04:40:34+5:302017-12-28T04:40:46+5:30
बाळापूर (अकोला) : मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमधून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री एक वाहन पकडले.
बाळापूर (अकोला) : मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमधून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री एक वाहन पकडले.
दरम्यान, दुस-या वाहनचालकाने पोलिसांना चकवून वेगाने बाळापूरकडे वाहन पळविले. या माहितीवरून रात्री गस्त घालत असलेले बाळापूरचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी यांनी मार्गावर नाकेबंदी करून, भरधाव वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. वाहनचालकाने त्याचे वाहन विठ्ठल यांच्या अंगावर घातल्याने ते बाजूला खाली पडले. भरधाव वाहनाचा पाठलाग करून, बाळापूर शहरात पोलिसांनी हे वाहनाला घेरून पकडले. मात्र वाणी यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी शे. अजीज शे. वजीर (३५) व शे. एहेसान शे. अमन (३३) यांना अटक करण्यात आली.