संतापजनक! अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न
By सचिन राऊत | Published: November 24, 2023 06:01 PM2023-11-24T18:01:17+5:302023-11-24T18:05:30+5:30
पीडित अडीच वर्षीय चिमुकलीवर जीएमसी रुग्णालयात उपचार.
अकोला : बुलढाणा जिल्हयातील बोराखडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन वर्ष सहा महीन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करीत तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडल्यानंतर या चिमुकलीला उपचारासाठी अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात आणण्यात आले आहे.
माेताळा तालुक्यातील बोराखडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन नराधमाने अडीच वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट देण्याच्या कारणावरुन एका निर्जणस्थळी नेत लैंगीक शाेषन केले. या प्रकाराची वाच्यता हाेण्याची भिती असल्याने आराेपीने तीला मारहाण करीत जावे मारण्याचाही प्रयत्न केला. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने बुलढाणा जिल्हयासह राज्य हादरले आहे. दरम्यान या चिमुकलीची प्रकृती प्रचंड गंभीर असल्याने तीला शुक्रवारी सकाळी उपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.