ग्रामसेवकाची चौकशी समितीसमोर येण्यास टाळाटाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:40+5:302020-12-23T04:15:40+5:30
सहा वेळा चौकशी समिती गावात चौकशीसाठी गेली. मात्र, ग्रामसेवक अवधूत यांनी चौकशी समितीसमोर येण्यास वारंवार नानाविध कारणे देत येण्यास ...
सहा वेळा चौकशी समिती गावात चौकशीसाठी गेली. मात्र, ग्रामसेवक अवधूत यांनी चौकशी समितीसमोर येण्यास वारंवार नानाविध कारणे देत येण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे आता गावात विविध चर्चांना उधाण आले आहे.
तक्रारकर्ता नवघरे यांनी याप्रकरणी ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी २१ डिसेंबरपर्यंत चौकशी अहवाल देण्यात येईल, असे प्रशासनाने लेखी दिल्यानंतर उपाेषण स्थगित केले हाेते. आजपर्यंतचा काहीही अहवाल देण्यास असमर्थ असल्याचे पंचायत समिती विस्तार अधिकारी व सहा. गटविकास अधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे.
--------------
फाेटाे::::::::::::
ग्रामस्थांचे बेमुदत उपाेषण सुरू
ग्रामपंचायत दुर्गवाडा येथे विविध विकासकामात झालेल्या लाखाे रुपयांच्या घाेटाळ्याची चाैकशी करून ग्रामसेवक सुनील अवधूत यांना निलंबित करून त्यांच्यावर व इतर दाेषींवर फाैजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी दुर्गवाडा ग्रामस्थांनी मूर्तिजापूर येथे २२ डिसेंबरपासून बेमुदत उपाेषण सुरू केले आहे.