फवारणीतून विषबाधेच्या घटनेनंतर जागृती; कृषी विभागाचे वरातीमागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 02:40 PM2019-08-28T14:40:12+5:302019-08-28T14:40:15+5:30
फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्यानंतर कीटनाशकाची फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीसंदर्भात घडीपत्रिकांद्वारे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची मोहीम कृषी विभागामार्फत येत्या आठ दिवसात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या १०५ घटना घडल्यानंतर शेतकºयांमध्ये जागृती करण्याचा कृषी विभागाचा हा प्रकार वरातीमागून घोडे हाकण्याचा ठरत आहे.
पिकांवरील विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना आॅगस्ट महिन्यात (२७ आॅगस्टपर्यंत) जिल्ह्यात १०५ शेतकºयांना विषबाधा झाली. कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर, कीटकनाशक फवारणी करताना व कीटनाशकाची हाताळणी करताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या कीटकनाशकात कोणती बुरशीनाशके मिसळावीत, कोणत्या कीड व रोगाच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाचे किती प्रमाणात द्रावण तयार करावे, कीटकनाशके खरेदी करताना व साठवणूक करताना काय काळजी घ्यावी, यासंदर्भात येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील शेतकºयांना घडीपत्रिकांद्वारे घरपोच मार्गदर्शन करण्याची मोहीम जिल्हा कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. कीटकनाशकाच्या फवारणीतून जिल्ह्यातील शेतकºयांना विषबाधाच्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, यासंदर्भात शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणारी मोहीम म्हणजे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार असल्याचा प्रत्यय येत आहे.
विषबाधित २२ शेतकºयांवर उपचार सुरू!
कीटकनाशक फवारणीतून आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत विषबाधा झालेल्या जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकºयांवर सध्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आॅगस्ट महिन्यात २७ आॅगस्टपर्यंत कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील १०५ शेतकºयांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी विषबाधित २२ शेतकरी सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर आहे.
-डॉ. कुसुमाकर घोरपडे
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.
जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकºयांनी जागृत असले पाहिजे. जीव अनमोल आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकरी -शेतमजुरांनी काळजी घेऊन संरक्षक किटचा वापर केला पाहिजे.
-जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी