दानापूर येथे कृषी विभागामार्फत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:09+5:302021-05-17T04:17:09+5:30
यावेळी कृषी सहायक कोकाटे यांनी शेतकऱ्यांनी घरी ठेवलेले सोयाबीन बियाणे बाजारात विक्री न करता घरच्या शेतात पेरणीसाठी राखून ठेवावे, ...
यावेळी कृषी सहायक कोकाटे यांनी शेतकऱ्यांनी घरी ठेवलेले सोयाबीन बियाणे बाजारात विक्री न करता घरच्या शेतात पेरणीसाठी राखून ठेवावे, बियाणे वापरताना शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासून म्हणजे ७० टक्के उगवण क्षमता असेल, तरच एकरी ३० किलो याप्रमाणे सोयाबीन बियाणे वापरावे, ७० टक्क्यांपेक्षा उगवण क्षमता कमी असल्यास बियाण्यांचा सीडरेट दर दोन किलोने वाढवा आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशीची पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने केली आहे. यावेळी सरपंच सपना वाकोडे, रवींद्र दामधर, साहेबराव विरघट, धम्मपाल वाकोडे, मनोहर कौलकार, सुनील रौदळे, संदीप गोरे, गणेश खोडे, कृषी सहायक सुशील कोकाटे आदी उपस्थित होते.
----------------------------
खिरपुरी बुद्रुक येथेही जनजागृती मोहीम
खिरपूरी बु.: खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त आहे. बाळापूर तालुक्यातील खिरपुरी बु. येथे कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
पेरणीसाठी स्वत:जवळील सोयाबीनचा वापर करावा, उगवण क्षमता तपासून घ्यावी, तसेच साधारणतः ७५ मिमी ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोयाबीन पिकावर पाने खाणारी अळीउंट, केसाळ अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला कृषी सहायक एस.डी. शेगोकार, मंडळ कृषी अधिकारी काळे, कृषी पर्यवेक्षक धनभर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.