भेंडीकाझी येथे बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:26+5:302021-04-17T04:17:26+5:30
---- मुंडगाव येथे रक्तदान करून महामानवास मानवंदना मुंडगाव : स्थानिक त्रिमूर्ती प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेमार्फत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...
----
मुंडगाव येथे रक्तदान करून महामानवास मानवंदना
मुंडगाव : स्थानिक त्रिमूर्ती प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्थेमार्फत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला मुंडगावचे सरपंच श्रावण भरक्षे, उपसरपंच तुषार पाचकोर, माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहीभात, पोलीसपाटील बाळू भगेवार, अकोट ग्रामीण मुंडगावचे बीट जमादार भास्कर सांगळे तसेच केशव सरकटे, भीमराव सरकटे, अर्जुन सरकटे, नागोराव सरकटे, माणिक सरकटे, सुभाष सरकटे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच संस्थेचे अध्यक्ष शेषराव सरकटे, उपाध्यक्ष मनीष सरकटे आणि सचिव सचिन सरकटे यांच्या रक्तदानाने शिबिराची सुरुवात करण्यात आली. रक्तदान शिबिरात ३२ युवकांनी रक्तदान केले. कार्यक्रमात मुंडगावचे बीट जमादार भास्कर सांगळे, मिलिंद सरकटे, सचिन सरकटे, शुभम वानखडे, विलास सरकटे, सागर वानखडे, वैभव वानखडे, विशाल गवई, योगेश गवई, शुभम सरकटे, सागर सरकटे, शे. सलीम, विकी मनोरे, प्रमोद सरकटे, अनिकेत सु. सरकटे, किशोर देवगिरे, अनिल सरकटे, प्रवीण वानखडे, विशाल वानखडे, अमन गवई, योगेश दामले, पत्रकार योगेश लबडे, नितीन रोठे, सुमेश सरकटे, धीरज नाथे, रुद्रपाल आराख, मनोज सरकटे, उमेश सरकटे, ज्ञानेश्वर कडोते, पत्रकार स्वप्निल सरकटे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी त्रिमूर्ती प्रतिष्ठानचे सदस्य रंजित सरकटे, दिलीप भरक्षे, विकास सरकटे, राहुल सरकटे, अंकुश सरकटे, अक्षय तायडे, शुभम गवई, राहुल वानखडे, दीपक मुंडोकार, विकास सरकटे, भूषण सरकटे, सुरज सरकटे, तेजस सरकटे, रोशन शिवणकार यांनी परिश्रम घेतले. (फोटो)
-------------------------------------------
बोरगाव मंजू येथील अभ्यासिकेत भीम जयंती उत्साहात
बोरगाव मंजू : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी ठाणेदार सुनील सोळंके यांनी विचार व्यक्त केले. मुलांनी बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे १८ तासांऐवजी दैनंदिन किमान १० तास अभ्यास करून अधिकारी बनावे, हीच बाबासाहेबांना खरी गुरुदक्षिणा असल्याचे मत, मुख्याध्यापक नंदकिशोर दळवी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यासिका अध्यक्ष पत्रकार देवानंद मोहोड यांनी केले. यावेळी संजय देशमुख, रवि विल्हेकर, अवधूत विल्हेकर, बोबळे, इरफान भाई, संदीप देशमुख व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आकाश विल्हेकर यांनी केले, तर आभार कोथळकर यांनी मानले. (फोटो)
---------------------------------------------------