अकोला : मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या आधारावर राज्यसभा, विधान परिषद तसेच मंत्रीमंडळात वाटा असावा तसेच सैन्य दल,खेळात आरक्षण देण्यात यावे यासाठीचे आपले प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री यांनी शनिवारी येथे केले.केंद्रीय मंत्रीमंडळात सहभागी झाल्यांनतर प्रथम आठवले अकोला दौºयावर आले आहेत. अकोला जिल्हा रिपाइंच्यावतीने त्यांच्या नागरीसत्काराचे येथे आयोजन करण्यात आले. याप्रंसगी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय खात्याचे राज्य मंत्री म्हणून त्यांच्या खात्याशी संबधीत योजना व आतापर्यत केलेल्या कामाची माहिती दिली. सद्या विद्यार्थ्यांना मिळणाºया भारत सरकारच्या शिष्यवृत्तीचा विषय गाजत आहे. या अनुषगांने बोलताना त्यांनी महाराष्टÑातील विद्यार्थ्यांचे ५०४ कोटी रू पये पाठवले असल्याचे सांगितले. माझ्या खात्याशी संबंधित कामे मी करतोच; पण मी राज्यमंत्री आहे. त्यामुळे मला तेवढे अधिकार नाहीत, मी केवळ शिफारस करू शकतो,अशी पुष्टी त्यांनी जोडली.मागासवर्गीय कर्मचाºयांना बढतीमध्ये आरक्षणाचा मुद्यावर एका प्रश्नादाखल त्यांनी हा प्रश्न न्यायप्रवीष्ठ असल्याचे सांगताना, उच्चन्यायालयाच्या निर्णयावर राज्यसरकार सर्वोच्च न्यायालयात जणार असल्याते म्हणाले. पण अशी पाळीच येवू नये म्हणून संसदेत कायदाच करण्यात यावा,यासाठीचे माझे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.रिपब्लीकन ऐक्याच्यासंदर्भात बोलताना त्यांनी ऐक्य ही काळाची गरज असल्याचे सांगताना, यापुढे जे ऐक्यात ऐणार नाहीत त्या नेत्यांना आंबेडकरी जनतेनेच जिल्हाबंदी घालण्याची गरज आहे. ऐक्यात भारिप-बमंसचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबडेकरांची अनुत्सुकता असल्याची मिश्किल टीकाही त्यांनी केली. १९९५ मध्ये झालेल्या रिपब्लिकन ऐक्याच्या मागे काँग्रेस चे नेते सिताराम केसरी, तथा शरद पवारांची भूमीका महत्वाची होती असे वाशिम येथे आयोजित सभेत अॅड. आंबेडकर बोलले होते.याचा आठवले यांनी इन्कार केला. हे ऐक्य आंबेडकरी समाज व जनतेच्या रेट्यामुळेच झाल्याचे ते म्हणाले.गुजरातमध्ये रिपाइंचा उमेदवार देणार नाहीगुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात त्यांनी भाजपाच बहुमताने येईल असा दावा केला असून,मागासवर्गीयांच्या पाठींब्यासाठी गुजरातमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मताची विभागणी टाळण्यासाठी गुजरात व हिमाचलमध्ये रिपाइं उमेदवार देणार नसल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. २०१९मध्येही भाजपाच केंद्रात सत्तेत येईल त्यावेळी आपण कॅबीनेटमंत्री असू असेही त्यांनी एका प्रश्नादाखल सांगितले. माझा पक्षा सत्तेवर अवलंबून नाही पण पक्ष मजबूत करायचा असेल कार्यकर्त्यांना सत्तेत वाटा हवाय, सद्या राज्यात महामंडळेच जाहीर झाली नाहीत त्यामुळे त्यांनाच नाही तर आपणास काय मिळणार असेही ते म्हणाले.मायावतींवरही टीकामागासवर्गीयावरील अत्याचार न थांबल्यास बौध्द धम्म स्विकारणार असल्याची धमकी बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिली,या प्रश्नादाखल त्यांनी मायावती बौध्द होणार नाहीत, हे त्याचे नाटक असल्याची टीका केली. मायावतीच्या सत्तेच्या काळातही मागासवर्गीयावर अन्याय होतच होता.