बाळापूर नागरी पत संस्थेतील ठेवीदारांचे आंदोलन; तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 06:41 PM2018-01-27T18:41:09+5:302018-01-27T18:44:37+5:30
बाळापुर : शहरातील बाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बाळापुर : शहरातील बाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बाळापुर नागरी पत संस्था १९९८ मध्ये शहरात स्थापन करण्यात आली होती. शहरातील मुख्य चौकात कार्यालय उघडून तेथे ठेवीदारांकडुन ठेवी घेऊन त्या ठेवी वर व्याज देण्यात येत होते. ठेवलेल्या ठेवी नागरिकांना व्यवसायासाठी व्याजाने देण्यात आली. गेल्या ३ वर्षा पासुन ठेवीदारांना ना व्याज ना मुद्दल मिळाली नसल्याने अनेक ठेवीदारांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या पुर्वी ठेवीदारांनी २ वेळा उपोषण केले. वेळोवेळी केवळ थकीत कर्ज वसुली सुरु आहे, वसुली झाल्यावर देण्याचे आश्वासन संस्था अध्यक्ष माजी आ. व प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एस. एन. खतीब हे देतात. पंरतु उपोषण कर्ते ठेवीदार स्वता: चे पैसे मिळत नसल्याने ञस्त आहेत. बेमुदत उपोषणला बसणाºयांपैकी शे. महेमुब अ. सत्तार, मारोती खंडोजी कळस्कार , भिमाबाई लक्ष्मण वाकोडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बाळापुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मुस्ताक अहेमद मो, इशाक ,ईसुफ खाँ दुलेखाँ ,शे. युसुफ शे. अय्याज , शे. आमद शे. वजीर , शे. अयूब शे. बिसमिल्ला , मालती विश्वनाथ गटोले , सुभदाबाई मारोती कळसकर ,जाकेराबी ज. कलीम शहा ,मो. अश्पाक खाँ मो, बुलंदखाँ यांनी आपल्या मागणीसाठी उपोषण सुरूच ठेवले आहे. बाळापुर नागरी पत संस्थेचे अध्यक्ष माजी. आ. एस, एन. खतीब यांनी ठेवीदारांची फसवणूक केली असून त्यांची आर्थिक गुन्हे शाखे मार्फत चौकशी करण्यात यावी व आम्हा सर्व ठेवीदाराचे व्याजासह पैसे मिळावे अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाळापुर नागरी पत संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी माध्यम म्हणून शहरातील सुशिक्षित बेरोजगाराना रोजगारा साठी व्याजाने दिले .वसुली साठी विशेष वसुली अधिकारी नेमुन वसुली सुरु आहे. वसुल झालेल्या रक्कमा ठेवीदाराना परत करणे सुरु आहे. उपोषण कर्त्यांपैकी अनेक जण न्यायालयात गेले आहेत. उपोषणासाठी वयोवृध्द नागरीकांना स्वत:च्या वैयक्तीक स्वार्थासाठी माझ्या व संस्थेच्या विरोधात भडकवीत आहे. सर्व ठेवीदारांचे ठेवी परत करण्याची संस्थेची जबाबदारी पार पाडू
- एस. एन. खतीब अध्यक्ष बाळापुर नागरी पत सस्था बाळापुर