अकोला शहरातील १० रस्त्यांवर जड वाहतुकीस बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:37 PM2019-02-04T12:37:07+5:302019-02-04T12:37:41+5:30
अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे.
अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत होत असलेली वाहनांची गर्दी लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी शहरातील १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी घातली आहे. ४ फेब्रुवारी ते ३ मेपर्यंत ही बंदी राहणार असून, सकाळी ७ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत या १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतुकीस बंदी राहणार आहे. जीवनावश्यक आणि महत्त्वाच्या सेवांची वाहतूक मात्र या रस्त्यांवरून होणार आहे.
या १० रस्त्यांमध्ये सिटी कोतवाली पोलीस स्टेशन चौक ते अकोट स्टॅन्ड चौक, दगडी पूल ते माळीपुरा चौक ते बियाणी चौकपर्यंत, अकोट स्टॅन्ड चौकातून सिटी कोतवालीकडे येणारा रस्ता, अकोट स्टॅन्ड चौक ते अग्रसेन चौकाकडे येणारा रस्ता, अग्रसेन चौक ते मुख्य बाजारपेठेत जाणारा रस्ता, टॉवर चौक ते फतेह चौक, रेल्वे स्टेशन मालधक्का ते रामदासपेठ पोलीस ठाण्यासमोरून दामले चौकात येणारा रस्ता, बाळापूर नाका येथून शहरात येणारा रस्ता, वाशिम बायपासकडून शहरात येणारा रस्ता तसेच डाबकी रोड रेल्वे फाटकाकडून शहरात येणाऱ्या रस्त्यावरील जड आणि माल वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये सदर १० रस्त्यांचा समावेश असून, अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक सेवेच्या जड आणि माल वाहतूक करणाºया वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. या आधी ३ नोव्हेंबर २०१५ ते ३ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत या १० रस्त्यांवर जड आणि माल वाहतूक करणाºया वाहनांना बंदी घालण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याकडे व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी अपेक्षा, सूचना व तक्रारी केल्यानंतर या रस्त्यावरील बांधकाम आणि शाळा, महाविद्यालय, बँक, चित्रपटगृहामुळे होणारी गर्दी लक्षात घेता सदर १० रोडवरील जड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
- विलास पाटील
वाहतूक शाखा प्रमुख, अकोला.