पीक कर्ज देण्यास बॅंकेची टाळाटाळ; अल्पभूधारक शेतकऱ्याने सुरू केले उपोषण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:24 AM2021-09-08T04:24:33+5:302021-09-08T04:24:33+5:30
मागील वर्षी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेचा व्याजासह भरणा केल्यानंतर, नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या बार्शीटाकळी शाखेच्या संबंधित ...
मागील वर्षी घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेचा व्याजासह भरणा केल्यानंतर, नवीन पीक कर्ज मिळण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेच्या बार्शीटाकळी शाखेच्या संबंधित अधिकाऱ्याकडे गत मे महिन्यात आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनही बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश जानराव सावळे यांना अद्यापही पीक कर्ज मिळाले नाही. पीक कर्जासाठी बॅंकेकडे वारंवार चकरा मारत असताना, पीक कर्ज देण्यास संबंधित बॅकेच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे पीक कर्ज देण्यासंदर्भात बॅंकेला आदेश देण्यात यावा तसेच पीक कर्जाच्या लाभापासून आतापर्यंत वंचित ठेवल्याने बार्शीटाकळी येथील संबंधित बॅंकेेच्या कारभाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी रेडवा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश सावळे यांनी ७ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.
पावसात उघड्यावरच
शेतकऱ्याचे उपाेषण!
पीक कर्जासाठी चकरा मारूनही गेल्या मे महिन्यापासून बॅंकेकडून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याच्या प्रकाराला कंटाळून रेडवा येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश सावळे यांनी भर पावसात उघड्यावरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
.......................फोटो.........................................