बँकांचे वेळापत्रकही बदलले ; उद्यापासून सकाळी ८ ते १२ पर्यंतच उघडतील बँका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 07:01 PM2020-04-08T19:01:00+5:302020-04-08T19:01:05+5:30

राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका सकाळी ८ वाजतापासून दुपारी १२ वाजतापर्यंतच उघडतील.

Banks' schedules also changed; Banks will be open from 8am to12 Pm from tomorrow! | बँकांचे वेळापत्रकही बदलले ; उद्यापासून सकाळी ८ ते १२ पर्यंतच उघडतील बँका!

बँकांचे वेळापत्रकही बदलले ; उद्यापासून सकाळी ८ ते १२ पर्यंतच उघडतील बँका!

Next

अकोला : कोरोना संसर्गाचा फैलाव अकोल्यातही मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने जिल्ह्यातील बँकांचे वेळापत्रकही बदलले आहे. गुरुवार ९ एप्रिलपासून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँका सकाळी ८ वाजतापासून दुपारी १२ वाजतापर्यंतच उघडतील. यादरम्यानही ‘सोशल डिस्टन्सिंग’ आणि ‘मास्क’चा वापर प्रत्येकास बंधनकारक आहे, अशी माहिती अग्रणी बँकेच्यावतीने देण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेता जिल्ह्यातील कार्यरत सर्व शाखांच्या कामकाजाच्या वेळेसंबंधी गुरुवारी परिपत्रक निघाले आहे.जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांनी गुरुवार, ९ एप्रिलपासून अकोला जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सहकारी बँका व खासगी बँका या सकाळी ८ ते दुपारी १२ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याचे कळविले आहे. तसेच शाखेमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन व निर्जंतुकीकरण नियमित करावे, असा आदेश लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिला आहे.

Web Title: Banks' schedules also changed; Banks will be open from 8am to12 Pm from tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.