तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थिनींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:12 AM2021-03-29T04:12:55+5:302021-03-29T04:12:55+5:30
सप्ताहादरम्यान भाषण स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा , स्वलिखित कवितावाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, पोस्टर बनवणे, निबंध तालुकास्तरावर लेखन स्पर्धा, व्हिडिओ बनवणे, ...
सप्ताहादरम्यान भाषण स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा , स्वलिखित कवितावाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, पोस्टर बनवणे, निबंध तालुकास्तरावर लेखन स्पर्धा, व्हिडिओ बनवणे, बालसाहित्य ई- संमेलन असे अनेक कार्यक्रम आठवड्याभरात साजरे करण्यात आले होती. या सर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फेसबुकवर सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेची निवड प्रक्रिया पातूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अनिल अकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी दीपमाला भटकर, राजेंद्र कटरे, साधनव्यक्ती संतोष राठोड, साधनव्यक्ती अनिल चिकटे आदींनी पार पाडली. स्पर्धांचा तालुकास्तरीय निकाल जाहीर झाला. तुळसाबाई कावल विद्यालय विद्यालयाच्या पल्लवी जगदिश खेडकर हिने ऑनलाईन पत्रलेखन स्पर्धेमध्ये वर्ग ३ ते ५ गटातून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय सायली उमेश खेडकर हिने, तृतीय येण्याचा बहुमान पातूर येथील ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांची मुलगी यशश्री देवानंद गहिले हिने पटकावला. विद्यार्थ्यांचे बेरार एज्युकेशन सोसायटीच्या सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत, प्राचार्य विजयसिंह गहिलोत, मुख्याध्यापक बी. एम. वानखडे, वर्ग शिक्षक स्वप्निल डोंगरे यांनी कौतुक केले.
फोटो: