निंभोरा येथील लाभार्थी घरकुलांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:33+5:302020-12-23T04:15:33+5:30
भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचे कागदपत्रे सादर करून घरकुल वाटपात घाेळ केल्याचा आराेप करून या प्रकरणाची ...
भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिक अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचे कागदपत्रे सादर करून घरकुल वाटपात घाेळ केल्याचा आराेप करून या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी संताेष भगत यांनी १५ डिसेंबर राेजी दिलेल्या निवेदनात केली आहे. बाेगस लाभार्थी दाखवून त्यांना अनुदानाचे धनादेशही देण्यात आले. असे असल्यावरही गावातील १० हजारांवर घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे. या प्रकाराची चाैकशी करून दाेषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत विचारणा केली असता, कागदपत्रे बदलून घरकुल देण्याचा प्रकार माझ्या कार्यकाळातील नसून तो प्रकार मागील सरपंचाच्या कार्यकाळातील असल्याचे सरपंच सविता गायकवाड यांनी म्हटले आहे.
----------काेट----
बनावट कागदपत्रे सादर करून लाभार्थीस घरकुलाचा लाभ दिल्याची तक्रार मिळाली. याबाबत लाभार्थीस नाेटीस देऊन खुलास मागविण्यात आला आहे.
अनंत वावगे, ग्रामसचिव