भारत बंद : पातूरात रास्ता रोको; हजारो नागरिक रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 10:48 AM2020-01-29T10:48:55+5:302020-01-29T10:49:28+5:30
पातूर येथील पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून, वाहतुकीची कोंडी झाली आहे.
शिर्ला (अकोला) : सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व बहुसंख्य संस्था आणि संघटनांच्या वतीने बुधवार २९ जानेवारी रोजी संपूर्ण भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून अकोला जिल्ह्यातील पातूर येथे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. पातूर येथील पोलिस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत असून, वाहतुकीची कोंडी झाली आहे. रस्त्यावर उतरलेल्या हजारो नागरिकांनी सीएए व एनआरसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हातात विविध फलक घेऊन उतरलेल्या नागरिकांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणुन सोडला. भारत बंद आंदोलनात प्रामुख्याने तीन मागण्या आहेत. यामध्ये डीएनए आधारित एनआरसी करा, सीएए हटवा, ईव्हीएम बंद करा व देश वाचवा, या प्रमुख मागण्या आहेत.