देगाव सर्कलमध्ये १ कोटी रुपयांच्या विकासकामांचे आज भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:18 AM2021-03-07T04:18:02+5:302021-03-07T04:18:02+5:30
भूमिपूजन सोहळ्याला वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित ...
भूमिपूजन सोहळ्याला वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे, प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, समन्वय समितीचे सदस्य दिनकरराव खंडारे, बाळापूर तालुकाध्यक्ष गजानन लांडे, माजी तालुका अध्यक्ष देवानंद अंभोरे, जि.प. अध्यक्षा प्रतिभा भोजने, जि.प.चे उपाध्यक्ष सावित्री राठोड, गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, समाज कल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी सभापती पंजाबराव वढाळ, जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर, बाळापूर पंचायत समितीच्या सभापती रूपालीताई मंगेश गवई, उपसभापती धनंजय दांदळे यांच्यासह भारिप बहुजन महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
खिरपुरी, नकाशी, भरतपूर, खामखेड, तामशी, मांडवा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत भूमिपूजन सोहळा कोरोना काळात शासन नियमांचे पालन करून, भूमिपूजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ नारायणराव गव्हाणकर यांनी दिली आहे. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खिरपुरी, नकाशी, भरतपूर, खामखेड, तामशी, मांडवा येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सचिव आणि ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.