वीज बिलाला मिळाला नवा चेहरा!
By admin | Published: March 27, 2017 02:47 AM2017-03-27T02:47:35+5:302017-03-27T02:47:35+5:30
क्यूआर कोडची जोड; मोबाइल अँप डाउनलोड करणे झाले सोपे.
अकोला, दि. २६- महावितरणने वीज बिलाला आता नवा चेहरा दिला असून, सुटसुटीत माहितीसह मोबाइल अँप थेट डाउनलोड करण्यासाठी या बिलामध्ये ह्यक्यूआरह्ण कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे.
महावितरणचे नव्या स्वरुपातील वीज बिल ग्राहकांना वितरित करण्यात येत आहे. जुन्या वीज बिलाच्या तुलनेत ते अधिक सुटसुटीत असून, त्याची रंगसंगती आकर्षक करण्यात आली आहे. या वीज बिलात असलेल्या क्यूआर कोडद्वारे वीज ग्राहकांच्या सेवेसाठी असलेले महावितरणचे मोबाइल अँप डाउनलोड करता येत आहे. मोबाइलधारकांनी स्मार्टफोनमध्ये असलेल्या किंवा डाउनलोड केलेल्या क्यूआर कोड रिडरच्या माध्यमातून महावितरणच्या वीज बिलावरील क्यूआर कोड स्कॅन केला की थेट महावितरण मोबाइल अँपची लिंक उपलब्ध होत आहे. त्याद्वारे हे अँप डाउनलोड करता येणे शक्य झाले आहे.
विशेष म्हणजे वीज बिलावरील क्यूआर कोड हा अँन्ड्राइड, विंडोज व आयओएस या ऑपरेटिंग सिस्टमवर उपलब्ध आहे. महावितरणने विविध ग्राहकसेवा मोबाइल अँपच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे या अँपला चांगला प्रतिसाद लाभत आहे. राज्यात ११ लाखांपेक्षा अधिक ग्राहकांनी हे अँप डाउनलोड केले आहे.
मीटर रिडिंग न घेतलेल्या वीज जोडण्यांच्या ग्राहकांना देयके
तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येत असून, संबंधित ग्राहकांना त्यांच्या मोबाइल अँपद्वारे मीटर रिडिंग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणच्या सेवेबाबत वीज ग्राहकांना आपला अभिप्रायदेखील या माध्यमातून नोंदविता येईल.