बिरबल नाथांची नगरी मंगरुळपीर

By Admin | Published: October 28, 2016 12:03 PM2016-10-28T12:03:37+5:302016-10-28T12:03:37+5:30

विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे.

Birbal Nath city's Mangrul Peir | बिरबल नाथांची नगरी मंगरुळपीर

बिरबल नाथांची नगरी मंगरुळपीर

googlenewsNext
>नंदलाल पवार, ऑनलाइन लोकमत
मंगरुळपीर (वाशिम), दि. २८ -  विदभार्तील काही प्रसिद्ध धार्मिक स्थळांमध्ये मंगरुळपीर येथील बिरबलनाथ संस्थानचा समावेश आहे. संत बिरबलनाथ संस्थानमुळेच या शहराला बिरबल नाथांची नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दिवाळीत विविध ठिकाणाहून भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होते.  
 
श्री बिरबलनाथ महाराज हे मुळचे पंजाब प्रांतातील सिंधू नदीच्या तिरावर असणा-या चक्रपूर नावाच्या लहानशा गावाचे त्यांनी जीवनात प्रचंड परिक्रमा केली म्हणून त्यांना पृथ्वीनाथ असे म्हणतात. त्यांची बोली भाषा हिंदी होती हे नाथ संप्रदायाचे अनुयायी होते जेसनाथ हे त्यांचे गुरु होते. ‘झुले मे झुलता हे बाला, दुनिया का पालन करणेवाला’ हा त्यांचा आवडता मंत्र होता. नदीच्या संगमावर त्यांची भेट नेहमी भायजी महाराजांसोबत होत असे. वाघ, सिंहासारखे हिला पशू अगदी पाळीव प्राण्यांसारखे त्यांच्यासोबत राहत. धामणगावच्या मुंगसाजी महाराजांसोबत त्यांचे मधूर संबंध होते श्रीक्षेत्र कोंडोली येथे अतिवृष्टीझाली नदी नाले एक झाले. त्यावेळी बाबांच्या धुनीवर आणि त्यांच्या अंगावर पाण्याचा एक थेंबही पडला नाही हा चमत्कार बघून पिंताबर महाराज धावून आले. त्यावेळी  शेगाव येथे गजानन महाराजांच्या भेटीस येण्यासाठी सांगितले म्हणून पिंताबर महाराजसोबत शेगावी आले तेथे ते गजानन महारांजासोबत १५ दिवस राहिले, असा उल्लेख आढळतो. आपण जीवंत समाधी घेणार असे त्यांनी भक्तांजवळ एक दिवशी सांगितले त्यामुळे हा परिसर ढवळून निघाला त्यावेळी इंग्रजांचे राज्य होते जिवंत समाधी घेणे हा आत्महत्येचा प्रकार समजला जाई. म्हणून त्यावेळी गावचे प्रतिष्ठीत नागरिक लालसिंह जमादार यांनी अकोल्याला जाऊन त्यावेळेसचे जिल्हाधिकारी बॅनर्जी यांच्याकडे बिरबनलाथ महाराजांच्यावतीने नाथ महाराजांच्याच समाधीची परवानगी मागितली पण जिल्हाधिका-यांनी परवानगी नाकारून हा प्रकार स्वत: पाहण्याचा निर्णय घेतला.  त्यानंतर साधारण दीड महिन्यांनी जिल्हाधिकारी बॅनर्जी नियोजित वेळी आपल्या अनेक सहकारी अधिका-यासोेबत मंगरुळपीरला मंदिरात आले त्यांनी बाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी  बळजबरीने बॅनर्जी साहेबांच्या हातावर जळते निखारे ठेवले हातावरील निखा-यांचे तात्काळ पेढे झाले. हा चमत्कार बघून जिल्हाधिकारी स्तब्ध झाले आणि तांनी ताबडतोब समाधी घेण्यास परवानगी दिली. ४.२. १९२८ साली माघ वद्य पोर्णिमेला सायंकाळी ६ वाजता बाबा हजारो भक्तांसमोर पद्मासन लावून बसले आणि थोड्याच वेळेत त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १९२९ सालापासून दरवर्षी मंगरुळपीरला यात्रा भरविली जाते.

Web Title: Birbal Nath city's Mangrul Peir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.