राणी पद्मावती चित्रपटाच्या वादात भाजपाची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:14 AM2017-11-08T01:14:11+5:302017-11-08T01:14:58+5:30
अकोला : आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद् होणार्या राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला असतानाच, आता या वादात भाज पाने सुद्धा उडी घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद् होणार्या राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू संघटनांनी विरोध सुरू केला असतानाच, आता या वादात भाज पाने सुद्धा उडी घेतली आहे. या चित्रपटातील वादग्रस्त चित्रीकरण सेन्सॉर बोर्डाने बाद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लाग तील, असा गर्भित इशारा खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी दिला आहे. भाजप नेत्यांनी प्र थमच अशी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे जिल्ह्यातील वा तावरण गरम होण्याची चिन्हं आहेत.
भारतीय संस्कृती तसेच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम हिंदी चित्रपटसृष्टीने चालविले आहे. राजपूत राणी पद्मावती यांनी परकीय आक्रमणासमोर न झुकता अग्निकुंडात स्वत:ला जाळून देशासाठी बलिदान दिले. इतिहासातील तथ्य जाणून न घेता हिंदी चित्रपट सृष्टीने महापुरुषांच्या इतिहासाचे विकृ तीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. निर्माता संजय लिला भंसाळी यांनी तयार केलेल्या राणी पद्मावती चित्रपटात चुकीचा इतिहास साकारण्यात आला आहे. यामुळे हिंदू व राजपूत समाजाच्या भावनांना ठेच पोहोचणार असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील वादग्रस्त दृष्ये बाद न केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी दिला आहे.
रामनवमी शोभायात्रा समितीचा विरोध
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर तथाकथित बुद्धिजीवी भारतीय संस्कृती, परंपरा व इतिहासाला चित्रपटाच्या माध्यमातून विकृत करण्याचे काम करीत आहेत. देशाचा गौरवशाली इतिहास पाहता जात-पात-पंथ न पाहता सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रवृत्तींना विरोध करण्याची गरज असल्याचे नमूद करीत श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्वेसर्वा आ. गोवर्धन शर्मा, कैलास अग्रवाल, ब्रिजमोहन चितलांगे, गिरीश जोशी, अशोक गुप्ता, मोहन गुप्ता, नवीन गुप्ता, अनिल मानधने, सागर भारूका, नितीन जोशी, संदीप वाणी, रेखा नालट, बाळकृष्ण बिडवई, शंकर खोवाल, संजय अग्रवाल यांनी राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध दर्शविला आहे.