भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:53+5:302021-02-06T04:32:53+5:30
तेल्हारा: कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकाचा रोजगार ठप्प झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील ...
तेल्हारा: कोरोनाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकाचा रोजगार ठप्प झाला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १०० युनिट पर्यंतचे वीजबिल माफ करू, जास्त रकमेचे वीज बिल असल्यास सवलत देऊ, असे आश्वासन दिले होते; मात्र सद्यस्थितीत वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केल्या जाईल, असा आदेश दिल्यामुळे भाजपातर्फे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविला. यावेळी वीज बिल तात्काळ माफ करण्याची मागणी करीत सहायक अभियंता यांना निवेदन देण्यात आले.
तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, शहराध्यक्ष महेंद्र गोयनका यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यांना निवेदन देऊन तत्काळ वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा नयना मनतकार, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे, जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड, महिला आघाडी तालुका अध्यक्षा मोनिका वाघ, न.प. अध्यक्षा जयश्री पुंडकर, महिला आघाडी माजी जिल्हा सरचिटणीस कल्पना पोहणे, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष राजेश पालीवाल, भाजयुमो शहराध्यक्ष गणेश इंगोले, तालुका सरचिटणीस पुंजाजी मानकर, ज्ञानेश्वर सरप, शहर सरचिटणीस गजानन गायकवाड, रवि गाडोदिया, नगरसेवक अनुप मार्के, सुनील राठोड, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष लखन राजनकर, तालुका प्रसिद्धीप्रमुख रवी शर्मा, उपाध्यक्ष विजय देशमुख, राहुल झापर्डे, गजानन नळकांडे, प्रवीण येउल, श्रीकृष्ण पवार, नागोराव वानखडे, नारायण गोयल, फकीरचंद भट्टड, मधुकर कुकडे, अमृतराव राऊत, विलास पाथ्रिकर, संदीप नेमाडे, दीपक वानखडे, गजानन गावत्रे, संजय गोयनका, अलकेश जवंजाळ, शेरु भाई, ऋषभ ठाकरे, मोहन चंदन, अनिल वानखडे, छोटू विखे, मारोती साबे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.