पातुरात वीज बिलांची होळी करीत भाजपाचे आक्रोश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:32 AM2021-02-06T04:32:51+5:302021-02-06T04:32:51+5:30

पातूर : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावल्याने सर्वसामान्य ...

BJP's agitation agitation on Holi of electricity bills in Patura | पातुरात वीज बिलांची होळी करीत भाजपाचे आक्रोश आंदोलन

पातुरात वीज बिलांची होळी करीत भाजपाचे आक्रोश आंदोलन

Next

पातूर : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात व्यवसाय ठप्प पडले आहेत. अनेकांचा रोजगार हिरावल्याने सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच महावितरणने थकबाकीदारांना वीज कनेक्शन कापण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. तसेच वीजबिल न भरल्यास वीजग्राहकांवर कारवाई करण्याचे आदेश दिला. त्यामुळे सरकारच्या विरोधात शुक्रवार, ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजता भाजपतर्फे महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बील जाळून टाळा ठोको, आक्रोश आंदोलन करण्यात आले.

यावेळी राज्य सरकारने लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा राज्यभर विजबिले न भरण्याची मोहीम हाती घेऊ, असा इशारा देण्यात आला. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अशातच विज कंपन्यांकडून नागरिकांना अव्वाच्यासव्वा बिले आली आहेत. त्यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे, ज्यांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत, अशांना ही बिले भरणे कठीण झाली आहेत. त्यामुळे सरकारने ३०० युनिट पर्यंतच्या ग्राहकांची विजबिले तत्काळ माफ करावीत, अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, तालुका अध्यक्ष रमण जैन यांनी केले. यावेळी उपस्थित विजयसिंह गहिलोत, प्रेमानंद श्रीरामे, चंद्रकांत अंधारे, राजू उगले, कपिल खरप, भिकाभाऊ धोत्रे, राम गोळे, गजानन निमकाळे, अभिजीत गहिलोत, संदीप तायडे, गजानन खंडारे, राजेश आवटे, निशांत बायस, दिलीप इंगळे, सचिन शेवलकार, सचिन बारोकार, सचिन बायस, ज्ञानेश्वर जाधव, विनेश चव्हाण, सागर आखरे, विष्णू शेलारकर, बाबूराव गावंडे, गजानन काटे, जयश्री घुगे, वैशाली निकम, तुलसाबाई गाडगे, रेखा कडू, मीना तायडे, मंजुषा लोथे, कल्पना खराटे, उमा जाधव, मंगेश केकन, अनिल ताले, श्रीकांत बराटे, संतोष शेळके, गजानन येनकर, गजानन शेंडे, नाजूक दुतोंडे, सुनील हलवणकर, संजय उजाडे, विश्वनाथ ताले, सुरेश मुर्तडकर, नितीन इंगळे, पवन जोगतळे, शुभम बोचरे, नीलेश मुदरकर, दीपक देवकते, रवींद्र मुर्तडकार, अमोल देवकते, सहदेव लाहोळे, सुनील इंगळे, माणिक इंगळे, शिवाजी नपते, वसंत आडे, सुरेश देवकते, चंदू जाधव, गजानन भोकरे, सीताराम हांडे, सुरेश करवते, आशिष काळे, मुकेश शर्मा, रमेश राठोड, वासुदेव देशपांडे, प्रमोद उगले, नारायण देशमुख, गणेश गाडगे, धनंजय पाचपोर, राजेश निमकाळे, गणेश गिरी, महेश वैद्य, किरण टप्पे, संजय करोडदे, मदन खंडारे, गोलू काळे, हिरा वैद्य, सुनील खंडारे, दता लुलेकर, सतीश इंगळे, गोपाल फुलारी, नीलेश फुलारी, संतोष इंगळे, महादेव गावंडे, विश्वनाथ टप्पे, विशाल काळे, रामा शिंदे, अजय गिरी आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: BJP's agitation agitation on Holi of electricity bills in Patura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.