४७ अंश सेल्सिअस तापमानात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:37 PM2019-04-29T12:37:21+5:302019-04-29T12:37:26+5:30
अकोला : शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
अकोला : शहराचे तापमान ४७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असताना श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. रक्तदात्यांचा उत्साह वाढविण्यासाठी यावेळी राज्यगृहमंत्री तथा पालक मंत्री डॉ. रणजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
उन्हाळ्यात बहुतांश लोक रक्तदान करण्यास टाळतात. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये संकलित रक्ताचा तुटवडा जाणवतो. त्यात थॅलेसीमियाच्या रुग्णांना नियमित रक्तपुरवठा करणे गरजेचे असते. ही परिस्थिती लक्षात घेता श्रीराम सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी ४७ अंश सेल्सिअस तापमानात रक्तदान करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमावेळी महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, प्रा. गणेश बोरकर, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रोहित तिवारी, थॅलेसीमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीश आलिमचंदानी, मनसे शहराध्यक्ष राकेश शर्मा, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव राजीव शर्मा, भाजपा महिला आघाडीच्या सोनल ठक्कर, योगेश अग्रवाल, श्रीराम सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योगेश बुंदेले, हिंदू क्रांती सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विशाल शर्मा यांची उपस्थिती होती. यावेळी अकोला थॅलेसीमिया सोसायटीतर्फे रक्तदात्यांचा सत्कार करण्यात आला.