मूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरची एक बोगी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:11 PM2019-01-23T13:11:22+5:302019-01-23T13:14:24+5:30

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर जंक्शन स्टेशन वर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. असून सांगाडा शिल्लक राहिला आहे.

A bogie of 'Shakuntala' passenger at Murtijapur station was burnt | मूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरची एक बोगी जळून खाक

मूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरची एक बोगी जळून खाक

Next

-  संजय उमक
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर जंक्शन स्टेशन वर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. असून सांगाडा शिल्लक राहिला आहे. घटना बुधवारी रात्री १२:३० वाजताचे दरम्यान घडली. या आगीत जीवीत हानी झाली नसली तरी रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
      बुधवारी मध्यरात्री रेल्वे रुळावर चार डब्यांची मूर्तिजापूर - अचलपूर उभी असलेली शकुंतला पॅसेंजरच्या गार्ड बोगीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मूर्तिजापूर - यवतमाळ व मूर्तिजापूर - अचलपूर अशा दोन शकुंतला पॅसेंजर या रेल्वे स्थानकावरून सकाळी ७:१५ वाजता धावतात. परंतु मूर्तिजापूर यवतमाळ ही शकुंतला पॅसेंजर काही कारणास्तव अनेक महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, मूर्तिजापूर - अचलपूर ही गाडी नियमित असून, अचलपूर वरुन  संध्याकाळी मूर्तिजापूर येथे परत येते. नेहमी प्रमाणे मंगळवारी संध्याकाळी परत आलेली गाडी रेल्वे रुळावर मुक्कामी असते. दरम्यान रळावर डबे सोडून इंजिन लोको शेड मध्ये जमा होते. अशाच प्रकारे चार डबे रुळावर उभे असताना रात्री १२:३० वाजता गार्ड बोगीने अचानक पेट घेतला असता पहातात बोगी जागीच जळत राहिली. दरम्यान जळीत बोगीला चिकटलेले तीन डबे उपस्थितांनी सोडून ढकलत बाजूला केल्याने अधिक नुकसान टळले अन्यथा संपूर्ण गाडीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.
       आग विझविण्यासाठी मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या अग्नि शामक दलाला पाचारण करण्यात आले होते परंतू रुळांच्या व खड्ड्यांच्या अडथळ्यांमुळे अग्नि शमन दलाचा बंब घटनास्थळापासू खूप दुर ऊभा करावा लागल्याने तो पेट घेतलेल्या बोगी पर्यंत पोहोचूच शकला नाही त्यामुळे रात्री ३:३० उशिरापर्यंत बोगी जळत राहिली. परंतू रेल्वे स्थानकावर असलेल्या नळातून पाणी घेऊन बघ्यांनी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही.

Web Title: A bogie of 'Shakuntala' passenger at Murtijapur station was burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.